रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे.या सप्ताहाचे औचित्य साधून जि.प.प्राथ.शाळा कवडशी (डाक) येथे वृक्षारोपण करण्यात आले.
एक मुल एक झाड याप्रमाणे शाळेच्या प्रांगणात, परिसरात,शेताच्या बांधावर आंबा,फणस,चिकू,चिंच,वड,पिंपळवृक्ष, इत्यादी फळझाडे, गुलाब,कृष्णकमळ, शेंवती, मोगरा, सदाफुली आदी फुलझाडे, तुळस,अडूळसा, पानफुटी, कोरफड आदी औषधी वनस्पती, वांगी,टमाटर,दोडका,चवळी शेंगा, लौकी आदी भाजीपाला, सांबार, पालक ईत्यादी पालेभाज्याचे रोपण करण्यात आले.
वृक्षलागवड करून संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली.प्रधानमंत्री पोषण आहार योजना यामूळे प्रभावी होईल असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षिका कविता लोथे यांनी केले. तर वृक्षांवर माया कराल तर ते आपल्याला भरभरून देतात असे मुख्याध्यापक धनराज गेडाम यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळाव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.शि. कविता लोथे, मुख्याध्यापक धनराज गेडाम व आजी-माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.