कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-दिनांक २९/०७/२०२४ रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की,पोलिस ठाणे पारशिवनी हद्दीतील मौजा सिंगोरी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेती (गौणखनिज) बोलेरो पिकअप वाहनाव्दारे चोरटी वाहतुक होत आहे.
अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा सिंगोरी शिवार येथे पारशिवनी पोलिस स्टाफ यांनी बोलेरो पिकअप क्र. एम एच-४०/सीटी- १९२८ चा चालक आरोपी नामे तन्मय प्रकाश रोहनकर वय २० वर्ष रा वार्ड नं ३ खापरखेडा हा अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातून बोलेरो पिकअप मधिल १ ब्रास रेती कि. ४००० रू व बोलेरो पिकअप क एम एच ४०/सी टी- १९२८ कि. ४०००००/- रु एकुण कि. ४०४०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपी विरूद्ध कलम ३०३(२) भा.न्या.सं. सह कलम ३/१८१ मोवाका ४८(७), ४८ (८) महाराष्ट्र जमिण महसुल अधि. १९६६ सह कलम ४, २१ खाण आणि खनिजे अधि. १९५७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.