एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारतच्या विदर्भ प्रदेश सल्लागार पदी सिध्दार्थ पंचम चहांदे यांची नियुक्ती…

दामोधर रामटेके 

कार्यकारी संपादक 

            महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी (अप्पर तालुका/नगर परिषद ठिकाण) येथील श्री.शिध्दार्थ पंचम चहांदे यांची आज दिनांक ३० जुनला विदर्भ प्रदेश सल्लागार पदी नियुक्ती केली.

             राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे,राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली,”भारत देशासह महाराष्ट्र राज्यात एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत सदस्य नोंदणी सुरु आहे.तद्वतच सदस्य नोंदणी अन्वये विविध पदावर नियुक्त्या करण्यात येत आहेत.

            श्री.शिध्दार्थ चहांदे हे दिर्घकालीन अनुभवी समाजसेवक असून संवेदनशील व्यक्तीमत्व आहेत,त्यांनी अनेक चळवळीच्या माध्यमातून स्वकर्तृत्वाचे योगदान दिले आहे.त्यांच्या अनेक कार्यभागाची महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी दखल घेतली आणि त्यांना विदर्भ प्रदेश सल्लागार पदाची जबाबदारी नियुक्ती अंतर्गत सोपवली.

           महाराष्ट्र राज्यांतर्गत एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारतचे पदाधिकारी व सदस्य नियुक्तीचे अधिकार महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांना असल्याने त्यांनी यथायोग्य व्यक्तीची नियुक्ती विदर्भ प्रदेश सल्लागार पदी केली आहे.

       एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारतच्या विदर्भ प्रदेश सल्लागार पदी श्री.शिध्दार्थ चहांदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी,संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी,चळवळीतील स्नेहींनी,त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे.