बी के बी एन राज्य मार्गावर मोठ-मोठाले खड्डे पडल्याने लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनास जाताना भाविकांना त्रास… — जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बावडा या ठिकाणी येण्या आगोदरच राज्यमार्गाची दुरुस्ती व्हावी ग्रामस्थांची मागणी…

  बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

 बीके बीएन राज्यमार्गवर गणेशवाडी तालुका इंदापूर येथे मोठ मोठ्याले दोन ठिकाणी खड्डे पडल्याने सतत अपघात होवून नागरिकांना त्रास होत आहे. 

             लक्ष्मी नरसिंह तीर्थक्षेत्राकडे जाणारा राज्य मार्ग असल्यामुळे दळणवळण मोठ्या प्रमाणात आहे.दररोज हजारो भाविक मनोभावाने दर्शनसाठी जात आसतात. खड्डे न बुजवल्याने आनेकदा या ठिकाणी आपघात झालेले आहेत. इथून पुढे आशा घटना होऊ नये म्हणून राज्य मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी.

            तुकोबाराय पालखी सोहळ्यातील भाविक निरा नरसिंहपुर या ठिकाणी लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनास जाताना संभाव्य अपघातापासून वाचविण्यासाठी तातडीने खड्डे बुजवून घेण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.पालखीतील वाहने व हजारो वैष्णवांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच 12 जुलैला बावडा या ठिकाणी पालखी येत आसून , गणेशवाडी येथील दोन ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यात यावे.

          जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा सराटी या ठिकाणी मुक्कमाला आल्या नंतर हजारो भाविक लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनासाठी जात आसतात. त्यामुळे तातडीने राज्य मार्गावरील गणेशवाडी येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती व्हावी.

चौकट 

       बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांनी बी के बी एन राज्य मार्गावरील गणेशवाडी येथील दुरावस्थेकडे लक्ष देवून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे.