प्रतीनीधी / प्रसाद गांधी.
खेड तालुक्यापासुन 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट (मिनी महाबळेश्वर) वाहतुकीसाठी व पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे., याचे सव्वीस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील पर्यटन स्थळ आहे, घाटामध्ये खेड तालुक्यातील नागरिक तसेच बाहेरील नागरिक पर्यटनासाठी जात असतात परंतु सदर घाटाचा रस्ता हा गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून घाटामध्ये वाहनांचा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच काही नागरीक हे घाटामध्ये मद्यप्राशन करतात त्यामुळे तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे पत्र खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी खोपी ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे,