वणी : परशुराम पोटे
राजूर रेल्वेच्या जागेवरील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्राला लागून गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होत असुन नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. राजूर ग्रामपंचायतीची व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नसलेल्या या अवैध कोळसा सायडिंगला हटविण्यासाठी राजूर रिंग रोडवर राजूर बचाव संघर्ष समितीच्यावतीने ४ जुलै पासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
गावाच्या सीमेत येत नसला तरीही लागून असलेल्या कोलवॉशरीच्या कोळसा सायडिंग राजूर गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा कुठलाही नियम किंवा निकष पूर्ण न करता व परवानगी न घेता मनमानी पद्धतीने इथे कोळसा सायडिंग सुरू आहे. त्याचप्रमाणे या सायडिंगवर कोळसा आणण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग केला जात आहे. राजूर रिंग रोड ज्याची क्षमता १५ ते २० राजूर परिसर तांत्रिकदृष्ट्या टनाची असताना ५० टन कोळशाची वाहतूक केली जात आहे. याप्रकरणी राजूरवासीयांनी राजूर बचाव संघर्ष समिती स्थापन करून संबंधित विभागाला निवेदने देऊन एक दिवसीय रास्ता रोको केले होते. यावेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे निकष पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेण्यात येईल, असे वणीच्या एसडीओना निवेदन देताना राजूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकार्यांना आश्वासन दिले. त्यासाठी ७ दिवसांचा अवधी मागितला. त्यानंतर सात दिवस पूर्ण होऊनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आता दि.४ जुलै पासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती माजी जि.प.सदस्य संघदीप भगत यांनी येथिल विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डेविड पेरकावार, मो. अस्लम, कुमार मोहरमपुरी, सय्यद अशफाक, साजिद खान, अनिल डवरे, जयंत कोयरे, प्रवीण खानझोडे, मो. शरीफ, सावन पाटील, फिरदोस अली, आकाश हनुमंते, मो. खुसनूर आदी उपस्थित