चिपळूण (ओंकार रेळेकर)
शिक्षणात जिद्द ,चिकाटी मेहनत आणि एकाग्रता असली की उज्वल यश मिळविता येते.माझ्या बालवयात शिक्षणामध्ये सध्याची अत्याधुनिक शिक्षण पद्धती न्हवती पण एक उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन शिक्षणात लक्ष देऊन वाटचाल केली यातूनच मला आज हे यश मिळाले आहे अशी प्रतिक्रिया यूपीएसी मध्ये नुकताच उत्तीर्ण झालेले आयपीएस अधिकारी चेतन पंदेरे यांनी व्यक्त केली.
केवळ पुस्तकी ज्ञान घेऊ नका, आपल्या आवडी निवडी जपा. जीवनाचा आनंद घ्या. खेळण्यात व इतर गोष्टीतही आनंद मिळवा, चांगले संगीत ऐका, असे सांगत नुकत्याच झालेल्या यूपीएसी परीक्षेत उत्तीर्ण झालेले चेतन नितीन पंदेरे आपल्या बालपणीच्या आठवणीत रमले. मी लहानपणी माझ्या आवडीच्या सर्व गोष्टी करीत होतो. शाळेत स्वीमिंग, गार्डन अशा भौतिक सुविधा नव्हत्या. तरीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी लंगडी खेळायचो. तबला वाजवायचो,असे सांगत हे सर्व करीत असताना मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यांनतर यूपीएसीचा मन लावून अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशात खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली व यश मिळविले, अशी माहिती चेतन पंदेरे यांनी दिली. शहरातील कापसाळ येथील एसीबी इंटनरॅशनल स्कूलमध्ये गुरुवारी आयोजित सत्कार सोहोळ्यात चेतन पंढेरे बोलत होते. संस्थेच्यावतीने चेतन पंदेरे यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन चंद्रकांत भोजने, अमोल भोजने व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी व्यासपिठावर संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोजने,
साहित्यिक व इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे, चेतनचे वडील नितीन पंदेरे, आई सौ. पंदेरे. अमोल भोजने, चेअरमन सौ. सायली भोजने, व्हाईस चेअरमन सौ. सुवर्णाताई भोजने, संचालक पूजा भोजने, भाग्यश्री भोजने, लायन्स क्लबचे जगदीश वाघुळदे, पत्रकार ओंकार रेळेकर संतोष पिलके आदी उपस्थित होते. चेतन पंदेरे या वेळी म्हणाले, माझे वडील पोलीस खात्यात होते. त्यामुळे
शालेय जीवन शिस्तीत गेले. वडील ज्या सेवेत आहेत, त्या सेवेत वरिष्ठ पदावर जाऊन देशाची सेवा करण्याची इच्छा मनात आली व ते स्वप्न साकार झाले आहे. आई-वडिलांनी कधीही अमूकच कर, अशी सक्ती केली नाही. मला शिक्षणात पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील विद्यार्थी हुशार आहेत, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मी कधीही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करु इच्छिणाऱ्यांना मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या वेळी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत प्रकाश देशापांडे यांनी मनोगत व्यक्त करताना कोकण ही बुध्दिवतांची खाण आहे. दहावी व बारावी परीक्षेत कोकण बोर्ड राज्यात पहिल्या क्रमांकावर असते, परंतु स्पर्धा परीक्षेत आवश्यक तितके यश मिळत नसल्याची खंत व्यक्त करुन त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.मुख्याध्यापक श्री. राकेश भुरण यांनी शाळेविषयी माहिती दिली. अमोल भोजने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकार योगेश बांडागळे यांनीही विचार
व्यक्त करताना चेतन पंदेरे यांचे कौतुक
केले. चंद्रकांत भोजने यांनी भविष्यात
संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या
उपक्रमांची माहिती दिली. वसतीगृह व अन्य प्रकल्पांचीही त्यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गुणवत्ता अधिकारी सौ. नेहा माहाडिक यांनी केले. मुकुंद ठसाळे व अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.
फोटो : ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन चेतन पंदेरे यांचा गौरव करताना चंद्रकांत भोजने,
आमोल भोजने, चेअरमन सौ. सायली भोजने, व्हाईस चेअरमन सौ. सुवर्णाताई भोजने,
संचालक पूजा भोजने, भाग्यश्री भोजने, भुरण व अन्य (छाया: ओंकार रेळेकर)