पारशिवनी:- पारशिवनी तालुकातील करभाड येथे कृषी संजीवनी सप्ताह 2022 अंतर्गत दिनांक 25 जून ते एक जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहातील कृषी पूरक विविध कार्यक्रमांचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्या वतीने तालुका भर करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दिनांक 29 जून 2022 रोजी प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद दिवस मौजा करंभाड येथे साजरा करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मिलिंदजी शेंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चात्मक मार्गदर्शन केले यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न अडचणी यावर चर्चा करून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात कशाप्रकारे वाढ करता येईल ,गुलाबी बोंडअळी निर्मूलन तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव का झाला आणि कशामुळे झाला याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान याची माहिती घेतली .यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री कमलाकांत भजबुजे, श्री सुखदेवजी गुरुवे यांनी आपल्या शेतीतील अनुभव तसेच नाविन्यपूर्ण बाबींची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के.बी ठोंबरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी. गच्चे यांनी केले .

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री मिलिंद शेंडे, तालुका कृषी अधिकारी पारशिवनी डॉ.ए.टी. गच्चे, मंडळ कृषी अधिकारी श्री जी.बी वाघ श्री एस.आर शेंडे कृषी पर्यवेक्षक श्री पी.सी झेलगोंदे, श्री दळणे सरपंच करंभाड,आत्मा कर्मचारी श्री नासरे श्री सोमकुवर तसेचकृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com