मुंबई : नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होणार.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे सरकार येणार असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले भाजपाचे एकनाथ शिंदेंना समर्थन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण द्यायचे असून सर्वच गोष्टीत न्याय देण्याकरिता सरकार काम करेल, तसेच अन्य विकासात्मक गोष्टी ‘मेट्रो’ यांसारखे विकास प्रोजेक्ट सरकारच्या माध्यमातून केली जातील असे त्यांनी जाहीर केले.
दखल न्यूज भारत.