नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-शैक्षणिक सत्र 22 -23 ची सुरुवात दिनांक 29- 6 -2022 पासून संपूर्ण विदर्भात करण्यात आली .त्यानिमित्ताने कामाई करंजेकर विद्यालयात सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थींकरिता प्रवेशोत्सव घेण्यात आला. सर्वप्रथम एकोडी परिसरात पट नोंदणी विषयी जागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व नवागतांचे गेटवर तिलक, पंचारती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्व नवागतांना बँड व लेझीमनी सेलिब्रिटी प्रमाणे वर्गापर्यंत नेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद चेहऱ्यावर दिसत होता . नवागतांच्या स्वागताकरिता एकोडी व कुंभली केंद्राचे केंद्रप्रमुख ढवळे
सर ,एकोडीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ भूमिकाताई तिडके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास
गिरेपुंजे ,मुख्याध्यापिका बोरकर मॅडम यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन नवागतांचे स्वागत केले .याप्रसंगी केंद्रप्रमुख ढवळे सरांनी सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन विद्या विनयन शोभते हा मंत्र दिला .तर सरपंच सौ भूमिकाताई तिडके यांनी सर्व विद्यार्थ्यांनी शासनाच्या मोफत शिक्षणाचा फायदा घेऊन विद्यालयाचा नावलौकिक वाढवण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व वर्ग शैक्षणिक साधनांनी सुसज्ज करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता श्री आगाशे , श्री पटले, श्री राखडे ,श्री मुगुलमारे ,श्री सुरकार ,श्री कापगते ,श्री राठोड ,सौ खोब्रागडे. श्री एस एम कापगते,कु.साक्षी हेडाऊ, अजय मोहुरले कु.पटले श्री करंबे ,श्री हुमणे ,श्री धांडे ,सुभाषजी सुभाष लांजेवार, वरखडे, गणवीर, या सर्वांनी सहकार्य केले.