संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
मौजा:लवारी येथे दिनांक 29 जुन 2022 ला शाळा पूर्व तयारी दुसरा मेळावा जि.प .उच्च प्राथमिक शाळा लवारी येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे प.स.सदस्य साकोली प्रमुख अतिथी ग्रायत्री टेंभुर्णे सरपंच ,साधू नगरीकर ,इशिका निखारे,टेंभुर्ण मॅडम,मुख्याध्यापक हिरामणजी वाघाये, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक के.डी अतकरी , एस.एम कोचे, एम. आर डोंगरवार ,पी. बी मरस्कोल्हे, एन.एन वाडीभस्मे, रेवंता बिसेन, अंगणवाडी सेविका व पालक विद्यार्थी गावकरी उपस्थित होते.
उपक्रमाच्या अनुषंगाने सर्वप्रथम गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली पालकांना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. मार्गदर्शन नुसार मेळाव्यामध्ये बालकांच्या कृतीच्या नोंदणी करण्या करीता सात स्टॉल पुढील प्रमाणे लावण्यात आले.नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास ,सामाजिक आणि भावनात्मक विकास ,गणन पूर्वतयारी,पालक मार्गदर्शन, इत्यादी नोंदणी करणाऱ्या आली. अध्यक्षीय भाषणात अनिल किरणापुरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची प्रायमरी स्टेज खूप महत्त्वाची आहे पालकांनी आपल्या पाल्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन शिक्षकांशी मुलांच्या प्रगती विषयी संवाद केलं पाहिजे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, शैक्षणिक , सामाजिक,कला कौशल्य विकास कसा होईल. याकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे शालेय पूर्व कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कला सुप्त गुणांना वाव दिले पाहिजे विद्यार्थी चांगले घडल्याशिवाय समाज घडवू शकत नाही आणि तेच कार्य तुमच्याकडून व्हावे असे ते सांगत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.बी.मरस्कोले,प्रास्ताविक के.डी अतकरी, आभार एस.एम.कोचे यांनी केले.