छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
दिनांक २८/०६/२०२२ ला आरमोरी तालुक्यातील पळसगाव (जोगीसाखरा) येथे नवीन धान्य कोठार याचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला करण्यात आले.
या शुभप्रसंगी समाजसेवक प्रल्हाद नखाते, सरपंच जयश्री दडमल, उपसरपंच सोनी गरफडे ग्रामपंचायत सदस्य श्री.विकास चौके, श्री.श्रीराम गजबे तसेच अशोक भोयर, श्रीराम मेश्राम, सचिव प्रकाश कोंडावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर बांधकाम ठेकेदार अस्मद कुरेशी मु.कुरखेडा यांची फरवरीमध्ये २०२२ ला सुरुवात करून २५ जून २०२२ पर्यंत पूर्ण केले. ह्या सोयीमुळे गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांना धान्य साठवणूक करता येणार आहे. तसेच भाडे व इतर तत्वावरहि त्याचा वापर करता येणार असल्याने सदर गोडाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे झालेले आहे.
वरील कामाकरिता प्रल्हाद नखाते, रोजगार सेवक गणेश मातेरे, ग्रामपंचायत कार्यकारणी मंडळ तसेच पळसगाव येथील समस्त नागरिकांचे सहकार्य लागले.