पारशिवनी:- पारशिवनी येथे दि . 29/ जुन/2022 बुधवार रोजी कृषी संजिवनी मोहीम अंतर्गत पारशिवनी मध्ये प्रगतीशिल शेतकरी संवाद दिना निमिताने पारशिवनी तालुका कृ्षी अधिकारी डॉ. ए टी गच्चे च्या मार्गदर्शनात व मंडळ अधिकारी सुरज शेडें च्या सहकार्याने पारशिवनी येथे या विषयावर सभा घेऊन प्रगतिशिल शेतकरी व कर्मचारी यांच्या मध्ये विविध रोती तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली . कृषी सहायक श्री जे . बी . भालेराव , कवी पर्यवेक्षक . श्री पी सी . झेलगोंदे हे प्रामुख्याने उपस्थित होते . यात प्रगतीशिल शेतकरी श्री कमलाकर भजभुजे , राजू शिवरकर , रवि बोरिकर उपस्थित होते . प्रगतिशील शेतकरी श्री भजभुजे यांनी आपले मनोगत व्यक्त करतानी सागितले की स्वतः सोयाबिन पेरणीसाठी B B F यंत्र तयार करून त्याचा त्याव्दारे सोयाविन ची पेरणी केली व त्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये 25 टक्के वाढ झाली . यावर सविस्तर माहिती देतानी भजभुजे यांनी सागीतले की शेतकन्यांना B B E यंत्राद्वारे सोयाविन पीकाची पेरणी करावी असे आवाहन केले .
कृषी सहायक श्री जे बी भालेराव यांनी बीजप्रक्रिया , कापूस व सोयाबिन रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करणे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले . या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक पी . सी . झेलगोंदे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना व अध्ययावत तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.