एकोडी येथे शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे मिळावे यासाठी व्यवस्थापकाला दिले निवेदन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – दिनांक 30 मे ला एकोडी गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकोडी गट कार्यालयात जाउन ऊसाचे पैसे लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी एकत्र येत मानस उद्योग समूहाचे गट प्रमुख कमलाकर लांजेवार व शेतकरी संचालक भास्कर चिरवतकर यांना निवेदन दिले.

         शेतकऱ्यांची मागणी आहे की, खरीप हंगाम सुरू झाला आहे परंतु अद्याप ऊसाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या बाबीकडे कारखाना प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देउन ऊसाचे पैसे लवकरात लवकर द्यावे अन्यथा आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

            निवेदन देतेवेळी दिनेश कापगते , मिलिंद कापगते ,भास्कर चिरवतकर , माधोराव कापगते, गणेश चिरवतकर, प्रदीप डोंगरवार, चेतन कापगते, लोकेश दोनोडे, सोनू कापगते , प्रमोद गजभिये,यशवंत कापगते, बालकृष्ण डोंगरवर व अनेक शेतकरी उपस्थित होते.