पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज – बेघर, बेवारस, निराधार, अनाथ, भिक्षेकरी लोकांना आधार देऊन त्यांच्या मदतीसाठी धाऊन येणारे देवदूत शुभम पसारकर व त्यांच्या संपूर्ण टिमचा श्री साईबाबा देवस्थान गांधी वार्ड देसाईगंजचे संस्थापक मिलींद सपाटे यांनी स्थानिक ‘त्रिकालनेत्र’ कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या दिव्यवंदना आधार फाऊंडेशनला नगदी स्वरूपात मदत केली.
यावेळी दिव्यवंदना आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर तसेच त्यांची संपूर्ण टिम सुष्मा गलगले, सुप्रिया कंकलवार, कांचन निकोडे, प्रियंका पेटकर, लावण्या येलकुचेवार निलीमा धोडरे, दीक्षा अल्लुरी आदींचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करतांना मिलींद सपाटे समवेत ‘त्रिकालनेत्र’ चे संपादक प्रकाश दुबे, एन. एच. मोबाईल शॉपचे संचालक हरविंदरसिंग उर्फ छोटू टुटेजा, युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश शेडमाके आदी उपस्थित होते. यावेळी युकॉचे तालुका अध्यक्ष चहांदे यांनी सुद्धा आर्थिक मदत दिली.
शुभम पसारकर हे मुळचे चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर तहसिल येथील जामगांव/भिसी येथील रहिवासी असून ते दिव्यवंदना आधार फाऊंडेशन नावाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. रोड- रस्त्यावरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, अपघातग्रस्त लोकांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत मिलींद सपाटे यांनी पसारकर व त्यांच्या संपूर्ण टिमचा सत्कार करून त्यांना आर्थीक मदत दिली, सपाटे प्रमाणेच इतरांनी सुद्धा पसारकर यांच्या कार्याची दखल देऊन त्यांना प्रोत्साहीत करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.