जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज भारत
सिंदेवाही: लोकप्रतिनिधी असलेल्या ग्राम पंचायत सदस्याच्या तक्रारी नुसार कारवाही करण्यास हयगय करणाऱ्या पंचायत समिती कार्यालय सिंदेवाही मधील गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी ( पंचायत ) यांचा निषेध व धिक्कार आंदोलन तहसील कार्यालय सिंदेवाही समोर करण्यात आले.
सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे असे आहे पंचायत समिती कार्यालय अंतर्गत येत असलेली मौजा लाडबोरी मधील ग्राम पंचायत मध्ये सामान्य फंडात सरपंच व सचिवाने नागरिकच्या टॅक्स चा गैरवापर करून नियमाबाह्य खर्च केला अशी तक्रार विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री कमलाकर बोमनपल्लीवार यांनी पंचायत समिती सिंदेवाही इथे केली.
पण लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीला संबंधीत अधिकाऱ्यांनी केरची टोपली दाखवत भ्रस्टाचाराला आमचा पुरेपूर पाठींबा आहे असेच कारवाई न करता,सांगत असल्याने अशा निष्क्रिय व सामान्य नागरिकावर अन्याय करणाऱ्याना धडा शिकविण्यासाठी भीम आर्मी तालुका व शहर कार्यकारनी च्या सहयोगाने गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचा तीव्र निषेध करीत व गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचा मुर्दाबाद करीत घोषणा बाजी करीत निषेध करण्यात आला.
सदर आंदोलनाला समाजिक युवा ब्रिगेड संस्था नवरगाव व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सिंदेवाही कडून जनहिताच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.