रोहन आदेवार
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ/वर्धा..
मारेगाव तालुक्यातील टाकळी येथून दुर्दैवी घटना समोर आली आहे.मण्यार साप चावल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
काव्या वैभव खेवले असं या 14 महिन्याच्या चिमुकलीचे नाव आहे.तिला विषारी मन्यार जातीच्या विषारी सापानं चावा घेतला होता.
मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला. काव्याच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे.काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अधिक माहिती अशी की,आई पल्लवी व तिच्या कुशीत अवघ्या 14 महिण्याची काव्या खाली झोपून होती.अशातच रात्री 2 वाजता दरम्यान साप त्यांच्या अंथरुणात शिरला व काव्याच्या पायाला दंश केला.
दंश करताच काव्या रडायला लागली.आईला जाग येताच शेजारी विषारी मण्यार साप दिसला. दंश झाल्यानंतर तिला उपचारासाठी मारेगाव सरकारी रुग्णालयात नेण्यात आले,मात्र तिथे उपचार न झाल्याने वणी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार करण्यात आला व त्यानंतर लगेच तिला जिल्हा रुग्णालय चंद्रपूरला नेत असताना वाटेतच तिचा मत्यू झाला.
वेळेत मारेगाव येथे उपचार मिळाले असते तर तीचा कदाचित प्राण वाचवता आला असता.काव्याच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले असून,काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
चिमूकलीचे वडील वैभव खेवले हे त्यांच्या वडिल मारोती खेवले यांना लकवा मारला असल्यामुळे उमरी येथे उपचारासाठी सोबत होते.
**
“गावकरी म्हणतात,तालुका ठिकाणची आरोग्य यंत्रणा सक्षम असावी..
गावखेड्यातील नागरिकांचा उपचार तालुका ठिकाणी होत असल्याने तालुका स्तरावरील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात सर्व आजारांच्या औषधी असणे आवश्यक आहे.
याचबरोबर तालुका ठिकाणचे डॉक्टर तज्ञ व अनुभवी असणे गरजेचे आहे.यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने गावखेड्यातील नागरिकांचा विना उपचारांनी नाहक बळी जाऊ नये याबाबत दक्षता घ्यावी..