काटकुंभ येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…

 

दखल न्युज भारत चिखलदरा

तालुका प्रतीनीधी

अबोदनगो चव्हाण

 

 चिखलदरा:- दिनांक 28 एप्रिल 2023 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकुंभ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 1 साजरा करण्यात आला.शैक्षणिक सत्र 2023-24 मधे इयत्ता 1ली मधे दाखल केलेल्या मुलांच्या शाळा पूर्व तयारी च्या अनुषंगाने सदर मेळावा आयोजित करण्यात आला. 

     मेळाव्याला प्रमुख  

शा. व्य.उपाध्यक्ष बाजीलाल बेठेकर काटकुंभकेंद्र च्या केंद्र प्रमुख नामदेव अमोदे मुख्याध्यापक चावरे मँडम वाढवे मँडम मावस्कर सर घायर मँडम.पत्रकार मेषक चव्हाण. नरेश राठोड. अगंनवाडी सेवीका पालक वर्ग उपस्थित होते.  

   मेळावा सुरवात गावातून प्रभात फेरी काढून झाली.सदर प्रभात फेरीत माता व बालक सोबत व्य.स. सदस्य गावकरी उपस्थित होते.

 पट नोंदणी झालेल्या बालकाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे त्यांच्या माताही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या प्रत्येक टेबलवर जाऊन मुलांनी कृतीकेल्यात. मुलांच्या मातांना शाळेतलं पहिलं पाऊल ही पुस्तिका देण्यात आली त्या पुस्तिकेबाबत मातांना मार्गदर्शन केले. पूर्ण स्टॉलची पाहणी उपस्थितानी केली.मुले कशा कृती करतात त्यांना मार्गदर्शन स्वयं सेवक अगंण वाडी सेविका आणि शिक्षकांनी केले.मेळावा चांगल्या पद्धतीने पार पडला