विलास भाऊ कापगते व डी.टी.मेश्राम यांचा सेवानिवृत्ती सत्कार…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

 

साकोली :नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील वरिष्ठ लिपिक विलास भाऊ कापगते तसेच परिचर डी.टी.मेश्राम यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ विद्यालयांमध्ये साजरा करण्यात आले. 

          नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाचे मुख्याध्यापिका रसिका कापगते, सत्कारमूर्ती विलास भाऊ कापगते व डी.टी.मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.के.जी लोथे सर, प्राध्यापिका स्वाती गहाणे, के.एम.कापगते, एम.एम.कापगते ,शोभाताई कापगते व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

          सत्कारमूर्ती विलास भाऊ कापगते व डी.टी. मेश्राम यांच्या शाल व श्रीफळ देऊन विद्यालयातर्फे मनःपूर्वक सत्कार करण्यात आले.

          विलास भाऊ कापगते व डी.टी.मेश्राम हे दोन्ही व्यक्तिमत्व अतिशय मनमिळावू व्यक्ती असून आपल्या कामात नेहमी तत्पर, कर्तव्यनिष्ठ, कामामध्ये अचूकता, वेळेवर निर्णय क्षमता आणि हजरजबाबीपणा असे व्यक्तिमत्व असून अशा व्यक्तींची विद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यकता आहे. सेवानिवृत्त होत असल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका रसिका कापगते यांनी व्यक्त केले.

         तसेच विद्यालयातील प्रा. के.जी.लोथे सर, धनंजय तुमसरे सर, एस.व्ही.कामथे सर यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करताना सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करून त्यांचा विद्यालयातील हा प्रवास त्यांच्यासाठी अविस्मरणीय आहे आणि ते नेहमीच या विद्यालयाच्या संपर्कात राहतील असा आशावाद ठेवून आपले मनोगत व्यक्त केले. 

        मान्यवरांच्या भावनापूर्ण भाषणांनी उपस्थित आमचे मन भरून आले होते. संपूर्ण कार्यक्रमात निरोप समारंभाचे वातावरण भावुक झाले होते. विद्यालयाने आपल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या दीर्घ आणि समर्पित सेवेचा उचित सन्मान केला, याची भावना उपस्थितांमध्ये स्पष्टपणे दिसून येत होती. 

            कार्यक्रमाचे संचालन डी. एस. बोरकर सर यांनी तर आभार प्रदर्शन आर. व्ही.दिघोरे सर यांनी केले.