
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) जमनापुर च्या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परिक्षेमध्ये सर्वोत्तम यश संपादन करून उंच भरारी मारली. यामध्ये नवजीवन सीबीएसई च्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, जिज्ञासा वृत्ती बाळगून या परिक्षेमध्ये ६ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले तसेच दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा नवोदय प्रवेश परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवळ होण्याची परंपरा कायम ठेवून नवजीवन सीबीएसई शाळेचे नाव लौकीकास आणले आहे.
नवोदय प्रवेश परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राचार्या भारती व्यास, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
नवजीवन सीबीएसई परिवारातर्फे विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय पालक, वर्गशिक्षक दीपा येळे, किशोर बावनकुळे, शालिनी धुर्वे, प्रिती फुलबांधे, सरताज साखरे, रोझी पठाण, शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले. विद्यार्थ्यांच्या अखंडीत सुयश व उत्कृष्ठ संपदानामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे व नवजीवन सीबीएसई शाळेचे नाव चर्चेचा विषय बनलेला आहे. यामध्ये वर्ग ५वी मधून पुर्वेश करंजेकर, अवनीश बहुरूपे, तुषार करंजेकर, विहान रामटेके, कु. निधी येळे तसेच मृणाल बारसागडे वर्ग ८वी या नवजीवन च्या नवरत्नांनी नवोदय परीक्षेमध्ये उंच भरारी मारली.