गिरीराज काँटन मिल आमडी घटना प्रकरणात २२ पेक्षा अधिक दमकलचे जवानांनी १२ तास मशकत करून आटोक्यात आणली आग. — ३० कोटी पेक्षा अधिक नुकसानीचे अनुमान… — गंभीर दुर्घटना…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी: – पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या आमडी फाटा लगत सात एकर जागेवर असलेल्या गिरीराज कॉटन कंपनीत आज रविवारला पहाटे ४:०० वाजता च्या दरम्यान भीषण आग लागली. 

      आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व भागातील तसेच औद्योगिक श्रेत्रातील आणि भंडारा,छिदवाडा,बैतुल परिसरातील सुमारे २२ अग्निशमन दल दुपार पर्यंत पोहोचले. 

 

       आज संध्याकाळी ७:३० वाजता आग आटोक्यात येऊ लागली.मात्र,अद्याप आग पूर्णपणे आटोक्यात आणता आली नाही.

        घटनेची माहिती घेतली असता,रविवार पहाटे ३:०० ते पहाटे ३:३० च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असल्याचे आढळून आले. 

       काही क्षणातच आगीने मोठे रूप धारण केले.कंपनीचा ४०% कापूस जळून खाक झाला.स्वच्छ केलेला कापूस आणि त्याचे बियाणे (सरकी) देखील आगित भस्म झाले आणि कापसाच्या गाठी सुध्दा जळून खाक झाल्यात.

      यासोबतच मोठ्या प्रमाणात कापूसही जळून राख झाला;तचेस कापुसला बिज काढण्याची एकुण ५० डीटी मशिनरी,विद्युत विभागाची डिपी व कंपनीची प्रेसिंग मशिन तसेच कंपनीचे वस्तू,आवश्यक साहित्य सह अन्य काही साहित्य जळून खांक झाले आहेत.

       सुमारे २५ ते ३० कोटीं रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जवळच सुमारे ४ हजार क्विंटल कापसाचा ढीग होता,जो आग आटोक्यात आणल्यानंतर वाचविण्यात आला. 

       यात वाडी औद्योगी क्षेत्रातील,मौदा,सावनेर,भंडारा,पारशिवनी,सौसर,बैतुल,छिंदवाडा येथून २२ पेक्षा अधिक अग्निशमन दल आग नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचले होते.

        आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी खूप प्रयत्न केले.आग काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी ती पूर्णपणे आटोक्यात येऊ शकली नाही. 

      आग पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात.

       गिरिराज कॉटन कंपनीतील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्रिगेड चे जवानानी खुब प्रयत्न केले असले तरी,सुमारे २५ कोटींचे पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

      कंपनी परिसरात जास्त कापूस साठवला होता.पण तो काही प्रमाणात वाचविण्यात यश आले.जिनिंग मिल मशीनसह आणि कंपनीची वास्तु जळून खाक झाली.

        घटना स्थळी पारशिवती पोलीसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती.