
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
आमड़ी फाटा वरील गिरीराज काटन मिल मधील कापुस व सरकी गोदामाला रविवार आज पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी १० ते१२ अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण करण्याची शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार,पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीतील आमडी फाटा जवळ गिरीराज काटन मिल इंडस्ट्रीजमध्ये मोठी आगीची घटना घडली आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १०/१२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहे.
मात्र आग एवढी भयंकर होती की,अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.
कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.पण कापुस व कापुसची गठाने व सरकीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अनुमान आहे.