
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातील नेरी येथील पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहीमची प्रभावीपणे अंमलबजावणी करत राबविण्यात आली असुन अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तिव्र करण्यात येणार आहे.
गावाचा विकास करण्यासाठी ग्रामकमेटी मागे हटणार नाही एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायतने अनेक विकासाची कामे केली आहेत.
जसे की ७० हजार वर्षांपूर्वीपासून येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात नेरी ग्रामपंचायतला यश मिळविले आहे. तसेच घोडाझरी धरनातुन गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. ही योजना ग्रामपंचायत ने आणली आहे जल जिवन मिशन अंतर्गत युद्ध स्तरावर काम सुरू आहे.
असे अनेक विकासात्मक कामे नेरी ग्रामपंचायतने हाती घेतले आहे.
ही अत्यंत मोलाची कामगिरी आहे असे सरपंच रेखा पिसे म्हणाल्या तसेच गावातील अनेकांनी दुकानदारांनी त्यांना निर्धारित केलेल्या जागे व्यतीरिक्त सिमा निर्धारित केलेल्या असुन मर्यादित जागेवर धंदा करावा पुढे पुढे सरकु नये व रस्ते वाहतुकीस मोकडे असावेत वाहतुकीस अडथळे निर्माण होईल असे क्रुत्य करु नये अन्यथा अतिक्रमण हटविताना कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत कमेटीने दिला आहे.
शासनाच्या अधिनस्त राहुन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाविण्यात येत असुन गावाचा विकास व्हावा विकासाच्या शासकीय योजना राबविण्याचा नेरी ग्रामपंचायत प्रयत्न करत असतांनाच या अतिक्रमणाचा सामना करावा लागतो.
अनेक शासनाच्या योजना राबवताना अतिक्रमण केलेले आड येत असते विकास कामाला खिड बसते परिणामी गावकऱ्यांनाही ग्राम विकासाचा फटका बसतो.
शासनाच्या वतीने महाराष्ट्र भर अतिक्रमण हटाव मोहिम तिव्र करण्यात आली आहे.
अतिक्रमण निर्मूलन करतांना गावकऱ्यांच्या तोंडुन ग्रामपंचायतची स्तुती करताना दिसुन येत आहे.
अतिक्रमण हटविताना ज्यांना स्वतः च्या मालकीची घरे आहेत त्यांनी घरी जावे ग्रामपंचायतच्या शासकीय कामात अडथळे आनु नये.
परंतु अतिक्रमण हटाव मोहिमेत राजकीय रंग देवु नये आपला गाव आपला विकास आपली माती आपली नाती असे समजून गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नेरी च्या ग्रामपंचायत कमेटीकडुन सरपंच रेखाताई पिसे यांनी केले आहे.