संविधानिक मूल्यांच्या अविष्कारितेसाठी होणारे 19 वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन म्हणजे, विद्रोहाचा जागर आणि व्यवस्थेला जाब….

            प्रत्येक लोकशाहीवादी देशासाठी “सॉक्रेटिसने” एक तत्वज्ञान सामान्य जनतेसाठी सांगितले आहे. की, “प्रत्येकाने आत्मपरीक्षण करुन समाजपरीक्षण केलेच पाहिजे. “याचा अर्थ हा आहे की, प्रत्येकाने आपला जन्म ज्या माता – पित्यापोटी झाला त्यांच्या ऋणात राहून स्वतःचे सामाजिक हक्क आणि कर्तव्य हे जपण्यासाठी स्वतःला नैतिक कर्तव्यातून सिद्ध करणे. त्यासाठी स्वतःला ओळखणे म्हणजेच आत्मपरीक्षण होय.

     आणि समाजपरीक्षण म्हणजे आपल्यावर जी व्यवस्था सर्वच क्षेत्रात राज्य करते ती व्यवस्था जर स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या निसर्गनियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांपासून दिशाहीन होऊन जर भरकटली. तर तीला पूर्वपदावर आणण्यासाठी तीला सर्वच क्षेत्रातून सार्वजनिकरित्या जाब विचारणे म्हणजे समाजपरीक्षण होय.यालाच संविधानिक भाषेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा असे म्हणतात. हा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानातून अनुच्छेद क्रमांक 19 ( क ) मधून प्रदान केलेला आहे.

        याच लोकशाहीवादी सामाजिक परीक्षणाचा आणि त्या विषयांच्या जागृतीच्या उत्क्रांतीची सुरुवात……….

     विद्रोही सांस्कृतिक चळवळीने 1999 मध्ये धारावी (मुंबई ) येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरवून केली.

     तथागत भगवान बुद्धानी येथील कू संस्कृती विरुद्ध म्हणजेच विषमते विरुद्ध समतेसाठी केलेल्या पहिल्या विद्रोहाचा आदर्श घेऊन नंतरच्या काळात फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी केलेल्या विद्रोहाचा वारसा खऱ्या अर्थाने विविध सांस्कृतिक क्षेत्रात समाजपरीक्षण करुन विद्रोहाची सुरुवात करण्याचे कार्य या पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनापासून केले.

       गेल्या 25 वर्षात एकूण 18 संमेलने झाली.या सर्व संमेलनाचा हा सामाजिक (संपूर्ण सर्वसामान्य शोषित नागरिकांचा समूह म्हणजे समाज या अर्थाने सामाजिक हा शब्दप्रयोग)जागृतीचा चढता आलेख ठरत आलेला आहे.

             आणि 2014 पासून तर व्यवस्थेने लोकशाही मूल्यांची फारकत घेण्याचे निश्चित केल्या मुळेच गेल्या 10 वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळीवर अजूनच जबाबदारी वाढल्यामुळे संमेलनातून जागृतीची धार आणखी तेज करत न्यावी लागली. 2023 मध्ये तर राष्ट्रपतीला आमंत्रित न करता हिंदू धर्म प्रसारकांकडून नविन संसदेचे उदघाटन करुन धर्मनिरपेक्षतेला आव्हान देण्याचे काम या व्यवस्थेने केल्यामुळे 2025 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ब्रीदवाक्यच…….

        संविधानिक मूल्यांना समर्पित आणि 151 वे सत्यशोधक समाज स्थापना निमित्त 19 वे विद्रोही साहित्य संमेलन.

        घोषित करण्यात आले आहे……..

        त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या 18 संमेलनापैकी 5 संमेलने ही सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या म्हणजेच जगण्यासाठी धडपडणाऱ्या अप्रत्यक्षपणे शासनाच्या तिजोरीत पैशातून बिदागी घेऊन अखिल भारतीय संमेलने भरत आलेली आहेत. जी की जेवणाच्या मेनुपासून ते मानधन ठरवण्यापर्यंत वादग्रस्त ठरत आलेली आहेत. अशा संमेलनांना त्यांची जागा दाखविण्याची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी या विद्रोही सांस्कृतिक चळवळी वर येऊन पडलेली आहे. ती सुद्धा पेलत ही 5 संमेलने सोलापूर, नाशिक, उदगीर, वर्धा, अंमळनेर येथे आमने – सामने संमेलने भरवले गेले आहेत.

          त्या अखिल भारतीय वाल्यांचा गैरसमज हा होता की हे विद्रोहीवाले शेपटाप्रमाणे आमच्यामागे येतात. खरेतर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने त्यांना महाराष्ट्रातून ( मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच बोलल्या जाते. असा महाराष्ट्र सोडून ) हाकलून देऊनच श्वास घेतला आहे. हे जेंव्हा संमेलनाच्या नंतर कळेल. तेंव्हा त्यांना विद्रोहाची खरी शक्ती त्यांना कळेल.

        शिवाय या पाचही संमेलनात हळूहळू ही अखिल भारतीय साहित्य संमेलने राजकीय हस्तक्षेपाने भरकट जाऊन सांस्कृतिक मूल्ये बाजूला फेकल्या गेली.

         म्हणूनच ज्याप्रमाणे ब्राम्हणांकडून, ब्राम्हणांसाठी, ब्राम्हनांनी ( इथे ब्राम्हण जात नसून कुटनीतीची वृत्ती या अर्थाने वापरलेला आहे ) निर्मिलेली संहिता म्हणजे मनुसंहिता अर्थात मनुस्मृती आहे. अगदी त्याप्रमाणेच ब्राम्हणांनी, ब्राम्हणांसाठी, ब्राह्मणीवृतीला पोसण्यासाठी सत्ताधारी व विरोधक या राजकीय पक्षांची घूसखोरी करवून घेऊन दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे……….

    अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन होय…..!

      म्हणूनच……..

        आज 2025 मध्ये होणाऱ्या 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीभूमीत म्हणजेच छत्रपती संभाजीनगरात ( औरंगाबाद ) भरवून एक वेगळी उंची गाठली आहे. हे जेंव्हा कधीतरी त्यांच्या लक्षात येईल तेंव्हा त्यांच्या पराभवाची कारणे ते शोधत बसतील…..!

       त्याचबरोबर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने विरोधाला विरोध कधी केला नाही. तर केवळ सू सांस्कृतीक आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठीच विद्रोह केलेला आहे. प्रसंगी टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी सुद्धा ठेलेली होती, आहे आणि राहील. परंतू जास्तीत जास्त प्रयत्न हा केवळ आणि केवळ आपल्या विद्रोहाचा पारदर्शक स्वच्छ आरसा दाखविण्याचेच कार्य तुलेनेने जास्त केले आहे.

         म्हणून सर्व सर्वसामान्य भारतीय नागरिकांना नम्र आवाहन आणि विनंती आहे की आपला देश, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी ज्या विचारांची आवश्यकता आहे. ती मिळविण्यासाठी प्रत्येकाने आत्मपारीक्षणासाठी त्यानंतर समजपारीक्षणासाठी जागृत होण्यासाठीच या विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र तर्फे भरवत असलेल्या………

       19 वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर मध्ये सहभागी होऊन आपले भारतीय नागरिक म्हणून संविधानिक कर्तव्य बजावण्यासाठी सहभागी व्हावे…

     ही नम्र विनंती…..

         त्याचप्रमाणे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा.प्रतिमाताई परदेशी आणि महाराष्ट्र राज्य संघटक मकिशोर ढमाले सर या दाम्पत्याचे महाराष्ट्र ऋणी राहील ज्यांनी या सांस्कृतिक चळवळीला धार आणली…..

            आवाहनकर्ता

एक भारतीय सर्वसामान्य नागरिक अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689