रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर:-
आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर यांचे ग्रामविकास व मतदार जागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना ग्रामिण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबिरातंर्गत मार्गदर्शन करतांना प्रत्येक विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी मतदान केलेले पाहिजे असे मत उपमुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
ते आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की मतदान करणे हा संविधानाने दिलेला मुलभुत हक्क आहे.तो युवकांनी व ग्रामस्थांनी बजावला पाहिजे.मताचे शस्त्र तुमच्या हातात आहे.ते शस्त्र योग्यपणे वापरण्या बाबत तरूणाची जबाबदारी जास्त आहे.
जो व्यक्ती उभा आहे.त्यांचे विषयी सर्वतोपरी विचार करा, चांगला व्यक्तींना निवडुन द्या,मतदारांनो तुम्ही जे ठरवल तेच होणार आहे.जे मतदान करीत नाही ते देशाचे वाटोळे करतात.निवडणुक आयोगाची प्रक्रिया निकोप व सुयोग्य आहे.असे त्यांनी अनेक उदाहरणाच्या च्या माध्यमातुन सांगीतले.
त्यानंतर माजी सरपंच व समाजसेवक प्रकाश मेश्राम यांनी युवकाच्या जिवनात शिक्षणाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगीतले गुरफटलेल्या परिस्थीतीत राहु नका,राहाल तर आयुष्याचे फलीत होणार नाही. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते प्राशन केले पाहिजे.गुलमाला गुलमाची जाणीव करून द्या,म्हणजे तो बंड करून उठले.शिक्षणाचा वापर वयक्तीक न करता समाज भावनेतुन करावा.दुःखाची निर्मीती आपण स्वतः करतो अशा अनेक उदयातुन शिक्षणाचे महत्व विद्यर्थ्यांना व ग्रास्थांना समजावुन सांगीतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सुभाष शेषकर म्हणाले की निशिकांत मेहरकुरे आणि प्रकाश मेश्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे.विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे.मोबाईलाचा वापर पॉझीटीव शिक्षणासाठी करावा. स्वतः पण अभ्यासाची स्पर्धा करावी.आपले जिवनकार्य सांगुन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्यात आणि उपस्थितांचे आभार मानले.