ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली -नवजीवन कान्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूल सीबीएसई साकोली येथे हुतात्मा दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर , वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व प्रशासकीय अधिकारी विनोद कीरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जिवनकार्याविषयी अतिशय मोलाची माहिती दिली. तसेच आजच्या दिवसाला हुतात्मा दिन का म्हणतात याविषयी मार्गदर्शन केले.
क्षमा हे बलवानांच लक्षण आहे. दुर्बल कधीच क्षमा करीत नाही या तत्त्वाचे अवलंब करावे, तसेच या महान देशभक्त राष्ट्रपिता यांचे गुण अंगिकरून देशकार्यात सहभागी व्हावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे संचालन रेखा हातझाडे व आभार माधुरी हलमारे यांनी केले.