कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – वेकोलि परिसरातील विधुत लोखंडी खांब कापुन आरोपी पळुन गेले.याचबरोबर २० फुट विधुत तार सुध्दा चोरी केल्याने आरोपी विरूध्द वेकोलि सुरक्ष रक्षकाच्या तक्रारीवरून पोस्टे कन्हान येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे .
पो.स्टे.कन्हान अंतर्गत वेकोलि जुना मेन चेक पोस्ट कांद्री येथे (दि.२४) जानेवारी २०२४ चे रात्री ९.३० ते १० वाजता दरम्यान सुरक्षा रक्षक संतोष इंद्रसान यादव, वय ३९ वर्ष, रा. मढीबाबा कॉलोनी खदान हा पेट्रोलींग करित असता आरोपी १) विशाल, २) नरेश उर्फ चाटीया दोन्ही रा. कांद्री यांनी संगनमत करून विधुत लोखंडी खांब कापुन नूकसान केले व पळुन गेल्याचे,तसेच आरोपींनी याआधी चोरी गेलेला ट्रांसमीटर विधुत तार २० फूट ५० एम.एम.किंमत २० हजार रूपयाचा चोरून नेला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी संतोष यादव यांचे तक्रारीवरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीतां विरुध्द कलम ३७९, ४२७, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सतिश फुटाणे हे करित आहे.