अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
कोजबी :- विद्युत रोहित्र वाहून येणारा ट्रॅक्टर कोसबी गावाजवळ बीएसएनएल टॉवर नजीक उलटला यामध्ये एक युवक गंभीर जखमी झालेला आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली वरून ट्रॅक्टर मध्ये विद्युत रोहित्र मांडून ते कुरखेडा येथे नेण्यात येत होते. सदर वाहन कोजबी गावावरून जात असताना गावालगत असलेल्या वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर वळणावर बीएसएनएल टावर नजीक उलटला.
यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकाचे नाव जयंत तुलावी राहणार कढोली असे आहे.
गंभीर अवस्थेत युवकाला तातडीने उपचारासाठी वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.