युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
सामदा ते सासन व भामोद ते सुकळी हा रस्ता डांबरीकरण केला गेला असून सदर रस्ता पूर्णता खराब झालेला आहे त्या रस्त्यावरून भामोद सुकळी सामदा सासन व इतर गावचे नागरिक तथा विद्यार्थी दर्यापूरला येणे जाणे करतात त्या रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना हाडांच्या आजाराचा त्रास सुरू झालेला आहे तसेच रस्ता खराब असल्यामुळे रात्रीचे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या गंभीर बाबीची दखल घेऊन सदर रोड करावा तसेच डेपो जवळील चौकातील चौफुलीवर असलेला शिवाजी महाराज चौक येथील चौफुलीवर आठ फुटाचा रस्ता हा दोन ठेकेदार असल्यामुळे दोघांनीही तिथे सोडलेला आहे.
त्यामुळे तिथे येता जाताना गाडीचे अपघात होतात ही गंभीर बाब कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणुन देण्यात आली व श्री खवले साहेब यांनी सदर माहिती त्यांना सविस्तर दिली त्यावरून त्यांनी सदर रस्ता त्वरित करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांनी मनसेच्या शिष्टमंडळात दिलेले आहे सदर निवेदन मनसे तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी पंकज कदम ऊप तालुका अध्यक्ष, गोपाल पाटील तराळ जनहित तालुकाध्यक्ष, मयूर कडू उपशहर अध्यक्ष, संदीप झळके उपशहर अध्यक्ष, प्रथमेश राऊत तालुकाध्यक्ष विद्यार्थी सेना, निखिल बिजवे, प्रवीण मार्के, अंकुश मानकर, अक्षय गावंडे, योगेश वरखडे , शैलेश आखरे, आकाश येवतकर,वैभव लायडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.