दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिं ३० जानेवारी २०२३
गडचिरोली: जिल्ह्यातील आशा वर्कर च्या विविध समस्येच्या संदर्भात खासदार श्री. अशोकजी नेते यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन स्वीकारले केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार व संवाद साधून आशा वर्कर च्या समस्या निकालीत काढण्याचे आश्वासन खासदार श्री अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा यांनी दिले.
यावेळी प्रकाश गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस भाजपा अनुसूचित जनमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, श्री विलास पाटील भांडेकर भाजपा तालुका संपर्कप्रमुख गडचिरोली.
आशा वर्करचे पदाधिकारी सोनाली संदीप ठाकरे,अश्विनी नरेंद्र लडके,कविता हेमंत कोटगले, प्रतिभा प्रभाकर पाल, सोनाली टिपेश आककेवार,विघा विलास जवादे, संगीता अमोल पेंदाम, सरीता चंद्रभान नैताम,गिता प्रकाश पांडे,संगिता गोविंदा गेडाम, भारती प्रकाश मोहुरले, विमल प्रमोद वेलादि,आशा वर्कर युनियनचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.