दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज यांच्या वतीने मुंबई ग्राहक पंचायतीच्या सहकार्याने ‘ग्राहक संरक्षण कायदा २०२९ आणि ग्राहक सक्षमीकरण ‘ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारती विद्यापीठाच्या विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र पार पडले. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे माजी अध्यक्ष ऍड.प्रणाली सावंत, मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष ऍड.शिरीष देशपांडे,पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.भारती विद्यापीठाच्या एरंडवणे कॅम्पस मधील अभिजीत कदम सभागृहात हे चर्चासत्र पार पडले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
ऍड.प्रणाली सावंत यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास सांगून नवीन आव्हानांची चर्चा केली.अॅड.शिरीष देशपांडे यांनी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजनांवर भर दिला.उमेश जावळीकर यांनी ग्राहक संरक्षण विषयक उदाहरणे सांगून वादांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा ग्राहक न्याय निवारण आयोगाच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले. आयोगाच्या कामकाजात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा सहभाग घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. मुंबई ग्राहक पंचायतीच्या विश्वस्त ललिता कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या.डॉ.ज्योती धर्म चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.डॉ.राजलक्ष्मी वाघ यांनी संयोजन केले.