अज्ञात इसमाकडून धान पुजनण्याची जाळपोळ.. — शेतकऱ्यांवर ओढवले संकट..

भाविक करमनकर  

धानोरा तालुका प्रतिनिधी

        धानोरा तालुक्यातील मौजा बोधनखेडा येथे दि.28 नोव्हेंबर च्या रात्री 8 ते 8.30 दरम्यान अज्ञात इसमाने शेतकऱ्याचे नुकसान करण्याच्या उद्देशाने धान पुंजनाला आग लावून जाळपोळ केली आहे.त्यामध्ये संपूर्ण धान जळून खाक झाले असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे.

       सविस्तर वृत असे की बोधनखेडा येथील शेतकरी घसिया बोगा व बाजीराव कुमोटी हे अल्पभूधारक शेतकरी असून मागील काही दिवसांपासून धान कापनी नंतर भारे बांधून त्याचे पुंजने तयार करून ठेवले होते.

          काही दिवसांनी ते क्रेशर च्या माध्यमातून चुरा करणारच होते.त्याआधीच अज्ञात इसमाने दिनांक 28 च्या रात्री ते पेटवून दिले असल्याची गंभीर घटना पुढे आली.

        हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.यामध्ये घासिया बोगा यांचे 250 भारे व बाजीराव कुमोटी यांचे 300 भारे जळून खाक झाले असून यंदाची पूर्ण कमाई नष्ट झाली आहे.

           गावकऱ्यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कारवाईची मागणी केली असून दोन्ही शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जावी यासाठी महसूल विभागाकडून व पोलीस विभागाकडून घटना स्थळाचा पंचनामा अपेक्षित आहे.