मोखड येथे जि.प.शालेय क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न…

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक

          प्राथमिक शालेय बिटस्तरिय क्रीडा महोत्सव मोखड येथे उत्साहात पार पडला. सरपंच तिलोत्तमा घोडेस्वार यांचेहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या स्पर्धाची सुरवात करण्यात आली. 

          दोन दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवामध्ये नांदगाव बिट मधिल 36 शाळेतील चम्मू सहभागी झाले होते. प्राथमिक स्तरातील पाच सांघिक तर माध्यमिक स्तरातील अकरा सांघिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच वैयक्तीक स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. त्यामधे प्रामुख्याने प्राथमिक ७५ मीटर धावणे, १०० मीटर धावणे, लांब उडी , उंच उडी, कुस्ती , चाटीरेस, गोलाफेक, दोरीवरील उड्या या क्रिडाप्रकाराचा समावेश होता.

            सांघिक सामन्यात कबड्डी प्राथमिक मध्ये अडगावच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली तर खो-खो मुले व मुली मध्ये सेलूनटवा चम्मु विजयी ठरली तर लंगडी मध्ये मोखड शाळेने बाजी मारली. 

          माध्यमिक विभाग मध्ये कबड्डी मुले मांजरी म्हसल्याची चंमु विजयी राहिली तर कबड्डी मुलींमध्ये सातरगाव चे विद्यार्थी अजिंक्य राहिले. खो-खो मुले मध्ये वाघोळा ची चम्मु अजिंक्य राहीले तर मुलीमध्ये माजरी म्हसला या शाळेने यश संपादन केले.

           व्हॉलीबॉल मुले मध्ये शिवनी तर मुली मध्ये सातरगाव विजय ठरले. बॅडमिंटन मुले आणि मुली मध्ये सावनेर शाळेने विजय संपादन केला. टेनिकॉइट मध्ये नांदगाव उर्दू शाळेने यश संपादन केले. रिले रेस मुलीं मध्ये मांजरी म्हसला चंमू विजयी ठरले तर मुलांमधे सावनेर चमूने बाजी मारली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जि. प. शाळा खिरसाना यांनी तर निदर्शने मध्ये अडगाव शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.

            या क्रीडा महोत्सवचे बक्षीस वितरण सोहळ्याकरिता आदरणीय डॉक्टर स्नेहल शेलार बिडिओ पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांची प्रमुख अतिथी लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय झंझाड, सहाय्यक बीडिओ, कल्पनाताई वानखडे गटशिक्षणाधिकारी प . स. नांदगाव खंडेश्वर ह्या उपस्थित होत्या.

             तसेच मंचकावर कविताताई संजय दुर्गे, उत्तमराव डाखोरे, डॉ.प्रफुल्ल कापडे, प्रियंका अजमेरे, योगिता परतेकी, वृषाली सोनवणे, अश्विनी सोनवणे, रहमतखा पठाण, मायाताई गावंडे प्रवीण पवार, शोभा चौखडे, नगमा शाहिन शाह, सचिन कापडे, प्रियंका काकडे, जफर अली, सुरज मंडे, अविनाश आढाव, कमलाकर कदम विराजमान होते.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र यावले, प्रास्ताविक कल्पना वानखेडे तर आभार प्रदर्शन सुरज मंडे यांनी पर पाडले. बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

           दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमांमध्ये अनिल देशमुख, दिपीका अर्बाळ, सतीश डोंगरे, स्वाती पोकळे, किशोर गणवीर, मनोज भांदर्गे. उमेश ठाकरे, रवी गजभिये, धनाजी चव्हान,संजय अंभोरे, संजय जोगदंड, प्रशांत सापाने,अजय गावंडे, स्वाती मोरे, राजू कांबळे, विजय नेमाडे, विजय खानझोडे, वैशाली दाहिकर, अजय देशमुख, संध्या शिंदे, मनोहर चव्हाण, सतीश डोंगरे, विजय चव्हाण, गजानन वाके अर्चना कवाने,प्रीती गावंडे, छाया पोटेकर आणि व्यवस्थापन समिती, मोखड ग्रामपंचायत पदाधिकारी मोखड आणि माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

           तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक आणि बीट मधील सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.