महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ… — प्रदेशाध्यक्ष मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेंचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार.

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

चंद्रपूर :- 

           महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेंचा वाढदिवस चंद्रपूर जिल्ह्यात यंदाही उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी दिली आहे.

         जिल्ह्यातील मूल तालुक्यात संघाचे तालुकाध्यक्ष सतिश राजूरवार यांनी नियोजन केले असून उपजिल्हा रुग्णालय मूल येथे सर्व रूग्णांना आवश्यक साहित्य व फळे वाटप कार्यक्रम नियोजीत करण्यात आले आहे.

मा.वसंत मुंडे सर प्रदेशाध्यक्ष

         सावली तालुक्यात राज्य मराठी संघ शाखेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

         चिमूर तालुक्यातील पदाधिकारी अध्यक्ष केवल सिंह जूनी यांचे नेतृत्वात शासकिय रुग्णालयात भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

              राजूरा तालुक्यात संघाचे जेष्ठ पदाधिकारी प्रा. डोंगे यांचे मार्गदर्शनात विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

   मा.विश्वासराव आरोटे सर सरचिटणीस 

           भद्रावती तालुक्यातील पदाधिकारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार असल्याचे कळते.

         याशिवाय नागभिड, ब्रम्हपूरी, बल्लारपूर,कोरपना तालुक्यातील राज्य पत्रकार संघ कार्यकारणी विवीध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटें यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी कळविले आहे.