शासकीय इमारतीचं सज्जा तुटल्याने पेंटरचा मृत्यू…

ऋषी सहारे

   संपादक

          कोरची तालुक्यातील बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय इमारतीवरील नाम फलक लिहीत असताना कोरची येथील पेंटर सुरेश तुकाराम कराडे वय ५५ वर्ष यांचा इमारती खाली पडून मृत्यू झाला. 

           २८ डिसेंबर गुरुवारी बोटेकसा येथे दुपारी अडीच वाजता दरम्यान आरोग्य इमारतीवर आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नाम फलक लिहीत असताना अचानक सज्जा तुटलामुळे पेंटर सुरेश कराडे हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागून दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टर राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून डोक्यावर गंभीर मार असल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. गडचिरोली जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक पत्नी एक मुलगा, एक मुलगी असं बराच मोठा कराडे परिवार आहे. शुक्रवारी सुरेश कराडे यांच्या मूळ गावी कोचीनारा येथे दुपारी दोन वाजता शेतावर त्यांचे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

            सध्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने सर्व आरोग्य विभागातील इमारतीवर जुने नाव बदलून नवीन नाव लिहिण्याचे आदेश काढलेले आहे.पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव होते ते बदलून त्या ठिकाणी आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नाव लिहिणे सुरू केले आहे. हे नाव लिहिण्यासाठी कोरची येथील पेंटर सुरेश कराडे यांना बोटेकसा आरोग्य विभागाकडून ६० रुपये स्केअर फूट नुसार काम दिला होता याच कामावर नाव लिहीत असताना इमारतीचा सजा तुटल्याने खाली पडून कराडे यांच मृत्यू झाला. सदर इमारत अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून येत आहे.

           बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील इमारतीचे बांधकाम सण २०१६ यावर्षी करण्यात आले परंतु या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यावेळी येथील अधिकारी इमारतीच ताबा घेण्यास नकार दिला होता.

            यावरून असे समजते की या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने येथील दर्शनी भागातील इमारतीचा सज्जा तुटला आणि पेंटर सुरेश कराडे याचे मृत्यू झाले. त्यामुळे पेंटर कराडे यांच्या नातेवाईकांनी कोरची पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन बोटेकसा प्रा.आ.केंद्र या शासकीय इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अभियंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे म्हणून लेखी तक्रार दिली आहे.