बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
सराटी तालुका इंदापूर येथील लोकनेते कैलासवासी प्रेमराज निवृत्ती जगदाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त प्रथिमेची महापूजा करून सर्वच वारकरी व भाविक भक्तांच्या व प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जगदाळे परिवाराच्या वतीने. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आकरावे वंशज गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांची कीर्तन सेवा घेण्यात आली.
कीर्तन सेवे प्रसंगी गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर बोलत आसताना म्हणाले की, जगदाळे परिवारातील महेश (काका) जगदाळे व आशोक जगदाळे, यांचे कार्य चांगलेच आहे. पंढरपूर वरून तुकाराम महाराज पालखी सोहळा माघारी आल्यानंतर यांच्या निवासस्थानी एक तास पालखी आसते वारकऱ्यानसाठी जगदाळे कुटुंबाच्या वतीने सर्वांना महाभोजनाची सोय मोठ्या प्रमाणात आनेक वर्षापासून आसते. हा पुण्याचा वाटा मोठा आहे. आशीच सेवा इथून पुढेही जगदाळे परीवार यांच्या कडुन घडावी, गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज किर्तन सेवे प्रसंगी बोलत होते.
कैलासवासी प्रेमराज निवृत्ती जगदाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त प्रतिमेचे पूजन व नैवेद्य देऊन महाआरथी सर्वच कुटुंबाच्या हस्ते तसेच आशोक जगदाळे, महेश जगदाळे, यांच्यासह सर्व कुटुंबातील सर्वांच्या हस्ते महा आरती घेण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर, प्रशांत पाटील, रावसाहेब मगर ,उदयसिंह पाटील, महादेव घाडगे, मयूर पाटील, किरण पाटील, हरिभाऊ घोगरे, संजय बोडके,सुनील बोडके,श्रीकांत बोडके, सह सर्वच जगदाळे परिवार, कोकाटे परिवार आणि गावातील ग्रामस्थ आनेक मान्यवर तसेच सराटी, बावडा, मळवली ,सुरुवड, वकीलवस्ती, पिंपरी टणु, गिरवी ,गोंदी, ओझरे ,गणेशवाडी, लवंग, संगम ,नरसिंगपूर, या सर्वच भागा, भागातून आनेक भाविक भक्त भजनी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांची कीर्तन सेवा झाल्यानंतर महाआरती करून महाभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प महेश सुतार महाराज यांनी केले.