नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली: भारतीय आयुर्विमा महामंडळतर्फे पश्चिम विभागीय कार्यालय अंतर्गत विमा अभिकर्त्यान करीता चलो द्वारका स्पर्धा डिसेंबर महिन्यातील १ तारखे पासून ३१ डिसेंबर पर्यंत सुरू आहे. या स्पर्धेत एल आय सी साकोली शाखेतील बऱ्याच नवीन जुण्या सर्वच अभिकर्त्यानी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत सर्वच अभिकर्त्यानी जास्तीत जास्त २५ पॉलिसी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये साकोली शाखेत नवीन अभिकर्त्यान मध्ये डिसेंबर महिन्यात नवीन महिला अभिकर्ता सौ. अर्चना उके यांनी चलो द्वारका स्पर्धेत २५ पॉलिसी पुर्ण करुन स्पर्धेत आपले स्थान प्राप्त केले. ही स्पर्धा २०२२ मधील एल आय सी ची सर्वात मोठी व वर्षाच्या शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर नवीन वर्ष २०२३ ची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला फारच महत्त्व आले होते.
नवीन अभिकर्त्यानी या स्पर्धेला एक चालेंज समजून पॉलिसी करण्याचा प्रयत्न केला व हे काम साकोली शाखेत पुजा कुरंजेकर यांच्या समूह नेतृत्वातील कुशल महिला अभिकर्ता सौ. अर्चना उके यांनी केले. आपल्या यशाचे श्रेय आपल्या समूह नेतृत्व पुजा कुरंजेकर यांना दिले.
साकोली शाखेत नवीन अभिकर्त्याचा उत्साह वाढविण्याचे काम साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार साहेब व सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे साहेब करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज शाखेतील नवीन अभिकर्त्यानच्या उत्साह मध्ये वाढ होऊन अभिकर्ता यश प्राप्त करीत आहे. अर्चना उके यांनी केलेल्या कार्याबद्दल साकोली विमा क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.