दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
चाकण : राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक, उद्योजक अशोकशेठ भुजबळ यांची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
तसेच निघोजे गावचे माजी सरपंच स्व.दयानंद येळवंडे यांचे चिरंजीव कुलदीप येळवंडे यांची विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी, माथाडी कामगार नेते किशोर गोरे यांची वाहतूक सेनेच्या तालुका प्रमुखपदी, मोहकल गावचे ग्रा. पं. सदस्य दत्ताशेठ राऊत यांची वाडा-कडूस गटाच्या शिवसेना उपतालुका प्रमुखपदी, माजी विभागप्रमुख गोरख बच्चे यांची नायफड-वाशेरे गटाच्या शिवसेना उपतालुका प्रमुखपदी तर शाखाप्रमुख संपत आढाव यांची शिवसेना उपविभाग प्रमुखपदी निवड झाली आहे.
शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, तालुकाप्रमुख राजुशेठ जवळेकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, शिवसेना जिल्हा संघटक निलेशभाऊ पवार, युवासेना तालुका प्रमुख विशालआप्पा पोतले, महिला आघाडी तालुका संघटीका माजी उपसभापती ज्योतीताई आरगडे यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीची पत्रे देण्यात आली आहेत.
यावेळी युवासेना समन्वयक अमोलशेठ इंगळे, शिवसेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ येळवंडे, युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे, शहरप्रमुख शंकरराव राक्षे, गाडकवाडीचे सरपंच वैभवशेठ गावडे, युवासेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ काचोळे, शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत, युवासेना उपतालुका प्रमुख सचिनभाऊ चोधरी, शिवसेना विभागप्रमुख राहुलशेठ थोरवे, सहकार सेना उपतालुका प्रमुख शंकरराव घेनंद, युवा नेते प्रविणशेठ पोतले, उद्योजक निलेशभाऊ आंद्रे, वडगाव घेनंद गावचे शाखाप्रमुख ऋषिकेश घेनंद, फायनल सम्राट संदिपशेठ संपत येळवंडे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.