कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील मौजा भुलेवाडी( बिटोली) गावातील गरीब शेतकरी यांनी आपल्या गायी शुक्रवारी सकाळी ११ वाजता आपल्या शेतात बाधले होते.
गाभण दुधारू गाय यांना पशुमालक धनश्याम ढगे यांनी शुक्रवार २९ नवंबरला सकाळी ११ वाजता दुध काढून शेतात बाधलेल होते.आज शुक्रवार २९ नवंबरच्या सकाळच्या दरम्यान वाघाने घनश्याम ढगे यांच्या गाभण दुधारू गायीला भर दिवसा जिवे मारले असल्याची घटना आज घडली.
घटनेची माहिती पशुमालक घनश्याम ढगे यांनी क्षेत्राचे वनरक्षक उमेश वावणे यांना दिली.वनरक्षक उमेश बावणे यांनी संबंधित घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
नंतर वनरक्षक उमेश बावणे व वनकर्मी यांचेसह घटनास्थळी पोहचले व घटनास्थळचा पंचनामा करून घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याना दिली व घटनेचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला.
या क्षेत्रात मागिल अनेक दिवसांपासून वाघ व बिबट फिरत होता.पारशिवनी वनपरिक्षेत्र हद्दीतील बिटोली, आमगाव,बाबुलवाडा,खैरी नवेगाव,नेऊरवाडा,पाली,उमरी माहुली,बच्छेरा,चारगाव,बिटोली आवडेघाट,तामसवाडी,नयाकुड,घुगसी,भागीमहारी सह जवळपासच्या गावात व शेतात वाघाची दहशत होती.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दुधाळू गायीची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी पशूमालक व गावातील नागरिकांनी केली.
याचबरोबर मोकाट वाघाचा बंदोबस्त करावा अशी भुलेवाडी,बाबुलवाडा,बिटोली,आमगाव,नेऊरवाडा,पाली,उमरी, काळापाटा तसेच जवळपासच्या शेतकरी व पशुमालकानी वनरक्षक यांचेशी चर्चा करून केली आहे.