कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायत बनपुरीच्या वतीने रामटेक विधान सभा क्षेत्रात पांच वेळा विजयी नवनिर्वाचित आमदार श्री.आशिष जयस्वाल यांचे अभिनंदन करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्कार समारंभाचे प्रसंगी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.शालिनीताई बावनकुळे,माजी सरपंच नंदलालजी बावनकुळे,उपसरपंच रुपेश ढोबळे,सचिव लांजेवारजी,ग्रामपंचायत सदस्य योगेश आखरे व ग्रामपंचायत महिला सदस्य उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चा पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र बावनकुळे,योगेश बावनकुळे,प्रशांत बावनकुळे व युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शालश्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार आशिष जैस्वाल अभिनंदन केले.
याच कार्यक्रमात गावातील समस्या व विविध विकास कामाची चर्चा गावकऱ्यांनी आमदार आशिष जैस्वाल यांच्या सोबत केली.