कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे दिनांक 28/11/2024 रोज गुरुवारी ठीक 6.30 वाजता सायंकाळी क्रांतीसुर्य,महान समाज सुधारक,स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांचा 134 वा पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री.रमेश बाजीराव चव्हाण( सेवानिवृत अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रम घेण्यात आला.श्री. गंगाधरराव अवचट माजी ग्राम पंचायत सदस्य) व श्री. दिनकररावजी मस्के ( संस्था संचालक)हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी महोदयांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण केली.सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी,तसेच श्री.सुमित घोरपडे,श्री.अभिषेक निमजे यांनी आधुनिक समाजक्रांतीचे जनक,प्रतिगामी व कर्मठ रूढी परंपरा विरोधात उभ्या आयुष्यात लढा देणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या स्वातंत्र्याचा व संविधानाचा खरा पाया या महात्म्याने रचला आहे. ,”जोतिबा रचला पाया,भीम झालेस कळस” असे त्यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन महोदयांनी केले.
सर्व उपस्थितांनी दोन मिनीटे मौन पाळले व श्रध्दांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये श्री.मनोहर कोल्हे संस्था सचिव यांनी स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य,महान सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला श्री.स्वप्नील वकलकर,श्री.अनिकेत दिवे,सौ.अल्का कोल्हे,कु.सानवी वानखेडे,कस्तुरी कोल्हे,चि.श्लोक धावडे,श्री.स्वप्नील भेलावे,श्री.राहुल पारधी,श्री. रोशन तांडेकर,श्री.मनोज चिकटे इत्यादी वाचकांच्या व सभासदांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.कुणाल कोल्हे यांनी केले.आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.