तळीपार आरोपीला कन्हान पोलीसानी केली घरातून अटक…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी…

कन्हान :- नागपुर जिल्ह्यातुन हद्दपार केलेला आरोपी विशाल नामदेव चिंचोळकर हा त्याचे राहते घरी वास्तव करित असताना कन्हान पोलीसांनी त्याला गोपनीय माहितीच्या आधारे घरुन ताब्यात घेतले व कारवाई केली.

             गुरूवार (दि.२८) नोहेंबर ला कन्हान पोस्टे चे स.पो.नि.राहुल चव्हाण सोबत पो.हवा हरीष सोनभद्रे,पो.ना. अमोल नागरे,पो.शि.अश्विन गजभिये,चालक पो.हवा.सतीष तेलेवार सह शासकिय वाहणाने परिसरात पेट्रोलींग करित असता आंबेडकर चौक कन्हान येथे मुखबिर द्वारे माहिती मिळाली कि,मा.पोलीस अधिक्षक साहेब नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने नागपुर जिल्ह्यातुन एक वर्षा करिता हद्दपार केलेला विशाल नामदेव चिंचोळकर वय ३६ वर्ष रा.धरमनगर कन्हान हा आपले राहते घरी वास्तव्य करित असल्याची खबर मिळाल्याने पंचासह त्याचे घरी गेले असता तो घरा समोर उभा दिसल्याने त्यास पंचासमक्ष परिचय देवुन विचारले की,पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे आदेश क्र.नाजि ग्रा.डी.३४ प्रति.कक्ष टोळी हद्दपार (दि.५) नोहेंबर २०२४ अन्वये नागपुर जिल्ह्यातुन एक वर्षा करीता हद्दपर केले असतांना आपण नागपुर जिल्ह्यात येण्याची परवानगी घेतली काय?असे विचारणा केली असता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितल्याने त्याची अंग झडती घेतली.

      तर कोणतेही मौल्यवान वस्तु किंवा संशयास्पद वस्तु मिळुन आली नाही.त्यास ताब्यात घेऊन पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात त्याचे विरूध्द कलम १४२ महा.पो का अन्वये कारवाई करण्यात आली.