दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला अखेर शहराध्यक्ष मिळाला असून, बहुप्रतिक्षीत असलेल्या पदावर माजी शिक्षण मंडळ सदस्य विलास सोपानराव कुऱ्हाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्र बुट्टे पाटील, कैलास कुऱ्हाडे, गणेश कुऱ्हाडे, अमित कुऱ्हाडे उपस्थित होते.
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भूमिकेच्या विरोधात निर्णय घेतला. पक्षात दोन गट पडल्यानंतर आळंदीत अजित पवार यांच्याकडे वर्चस्व असल्याचे चित्र होते. आता मात्र राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच आळंदीत शरद पवार गटाच्या वतीने पक्षबांधणी नव्याने सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.
विलास कुऱ्हाडे हे व्यापारी तरुण मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार तसेच आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आहेत, सामाजिक क्षेत्रात कायम कार्यरत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गटाच्या) शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान आळंदी शहरात पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच पक्ष्याध्यक्ष शरद पवार यांनी टाकलेल्या जबाबदाऱ्या पक्षाची ध्येय धोरण पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि सर्वाना बरोबर घेऊन पक्षाचं काम तळागाळातील जन्मानसंपर्यंत पोहचवून पक्ष भक्कम करण्याचा मी भविष्य काळात प्रयत्नशील राहील अशी भावना नवनिर्वाचित शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे यांनी निवडीनंतर सांगितले.