रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
महाराष्ट्र राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालकांना तुटपुंजे मानधन मिळत असून, त्या अल्प मानधनात भरपूर कामे करुन घेतली जातात.तद्वतच पूरेपूर मानधन दिले जात नाही.विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या संगणक परिचालकांनी आज चंद्रपूर येथील मोर्चातंर्गत व धरणे आंदोलनातंर्गत महाराष्ट्र शासनाचे व जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले.
येत्या नागपूर येथील अधिवेशनात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत डवले यांचे कडून शासनास आजच्या आंदोलनान्वये देण्यात आला.
संगणक परीचालकांच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामुळे १ तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे सदर संगणक परिचालकांच्या आंदोलनाने चंद्रपूर करांचे लक्ष मोर्चेकरांच्या मागण्यांकडे गेले…
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात आमच्या रूपाने पुरविलेल्या मनुष्यबळ करारामुळे csc & spv कंपनी मार्फत कोट्यावधींचा भ्रष्टाचार…देखभाल दुरुस्ती व साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली ग्रामपंचायत कडून वसूल केलेल्या पैशाचा गैरप्रकार करून पैसे गडप केले असल्याने त्या संबंधाने सखोल चौकशी करावी अशा पध्दतीची मागणी रेटून धरण्यात आली…
मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून घेतली दखल…
आपल्या मागण्या शासनस्तरावर लवकरात-लवकर मार्गी लागव्यात यासाठी प्रयत्न केले जाईल असा आशावाद मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी दिल्याने त्यांच्या शब्दाला मान देऊन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जिल्हा संघटना अध्यक्ष प्रशांत डवले यांना फोन करून मोर्चा व आंदोलनाचा घेतला समाचार…
सांगितले की येत्या एक हप्त्याच्या कालावधीत सदर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन व ग्रामविकासमंत्री यांचे सोबत चंद्रपूर शिष्टमंडळ यांना सोबतील घेऊन बैठक लावून समस्या सोडवुन दिल्या जातील दिला असा शब्द…