रामदास ठूसे
विभागीय प्रतिनिधी
नागपूर येथील दादासाहेब बालपांडे औषधनिर्माण महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक डॉ. अजय घनश्यामजी पिसे व सहकार्यांनी संशोधित केलेल्या मोहफुलांपासून अल्कोहोल विरहीत ‘म्याजीक महुआ’ नावाचे ‘एनर्जी ड्रिंक’ नागपूर येथील एग्रो-विजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण मंगळवारला करण्यात आले.
याप्रसंगी उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश चे कृषीमंत्री व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मोहापासून तयार केलेल्या या संशोधनाची प्रशंसा नितीन गडकरी यांनी केली. व बाजारात उपलब्ध असलेल्या केमीकलयुक्त कोल्ड्रिंक पेक्षा मोहाचे ‘म्याजीक महुआ’ ‘एनर्जी ड्रिंक’ जास्त उपयुक्त होऊ शकते यामुळे याचा जास्त प्रसार झाला पाहिजे असे मत नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या प्रकल्पामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील आदिवासी व बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
मोहाच्या समाजोपयोगी संशोधनाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रकल्पाला संस्थेचे अध्यक्ष मनोज बालपांडे, प्राचार्य डॉ. उज्वला महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.