रामदास ठुसे
विभागीय प्रतिनिधी
चिमूर क्रांती भूमीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या . नावाने असलेल्या महाविद्यालयात नॅक कमिटी तपासणीसाठी आली होती. दरम्यान तपासणी अंती नॅक कमिटीने बि प्लस चा दर्जा दिला. महाविद्यालयातील टिम वर्क प्राचार्य, प्राध्यापक तथा कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नाने शक्य झाले असल्याचे महाविद्यालयातील सभागृह येथे नुकतेच आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ दिपक यावले यांनी सांगीतले.
चिमूर येथील राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतील राष्ट्रसंत महाविद्यालयाची स्थापना होवून एक्कावन्न वर्ष झालीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी सोयी सुविधा, लायब्ररी , कंम्पुटर लॅब, तपासणी करिता तीन सदस्य टिम ऑक्टोबर महिन्यात आली होती. नॅक च्या नविन निकषानुसार महाविद्यालयाने सादर केलेचा स्वमुल्य निर्धार अहवालाचे सात निकषावर सुमारे सातशे गुणांचे मुल्यांकन केले. उर्वरित तिनशे गुणांचे मुल्यांकन पिअर टिममार्फत करण्यात आले या सात निकषांमध्ये अभ्यासक्रम अध्ययन – अध्यापन प्रणाली संशोधन व नव निर्मिती विस्तार पायाभूत सुविधा व अध्ययन स्त्रोत विद्यार्थी सहायता प्रगती प्रशासन नेतृत्व व प्रशासन संस्थालक मुल्ये व उत्तम उपक्रम याचा समावेश असतो या सातही निकषांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाने दमदार कामगीरी केली आहे. हे सर्व महाविद्यालयातील टिक वर्कमुळे घडून आले असून पूढील दोन वर्षात महाविद्यालयाची नविन वास्तू विद्यार्थ्यांच्या अध्यार्जनासाठी तयार होत असल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ दिपक यावले यांनी सांगीतले.
यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव विनायक कापसे, नारायण डांगाले, प्रा मारोतराव भोयर, श्रीहरी गोहणे, कालू निसार सय्यद, रघुनाथ कडवे, प्राचार्य डॉ अश्विन चंदेल, गुणवत्ता सेलचे समन्वयक तथा लेप्टनंट उपप्राचार्य डॉ प्रफुल बनसोड, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा आशुतोष पोपटे, प्रा कार्तिक पाटील, प्रा हर्षवर्धन गजभिये , प्रा कुमरे सह प्राध्यापक कर्मचारी आदी उपस्थित होते.