
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी येथे तालुकास्तरिय कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) संबंधी आढावा सभातंर्गत चर्चा सत्र डॉ.अर्चना कडू (मा. प्रकल्प संचालक आत्मा,नागपुर) च्या उपस्थितीत संपन्न झाले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती) अंमलबजावणी डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन वर्ष २०२३-२४ अंतर्गत दिनांक २९/ नवंबर/२०२३ रोजी पारशीवनी तालुक्यामध्ये स्थापित १५ सेंद्रिय शेतीवर आधारित शेतकरी गटाचे आढावा सभा व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आले.
सदर प्रशिक्षणास आवर्जून उपस्थित डॉ.अर्चना कडू मॅडम (मा. प्रकल्प संचालक आत्मा, नागपुर) यांनी आपल्या प्रास्तविका मध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना,उद्देश कार्यपद्धती,शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना व कार्यपद्धती,शेतकरी दैंनदिन नोंदी करणे,पीक नियोजन,गांडूळ खत युनिट,बीजप्रक्रिया,आंतरपीक लागवड,माती व पाणी परीक्षण महत्व,पीक अवशेषांचे कंपोस्ट करणे तसेच ट्रायकोड्रमा,अझोटोबॅक्टर,रायझोबीयम व लिक्वीड कन्सोर्शिया या जैविक निविष्ठा चा वापर व महत्वपूर्ण फायदे इत्यादी बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
तसेच सौ.पल्लवी तलमले मॅडम (मा. प्रकल्प उपसंचालक आत्मा,नागपूर) यांनी उपस्थित शेतक-यांना बांबू लागवड व त्यांचे फायदे,शत्रू किड मित्र किड यांची ओळख,जैविद्धतीने कीड नियंत्रण,कामगंध सापळे,पिवळे चिकट सापळे पक्षीथांबे,जमिनीत सुष्मजीवाणूंचा वापर,सेंद्रिय प्रमाणीकरण कार्यपद्धती,पकेजिंग व ब्रॅडिंग,रसायन मुक्त अन्न धान्य तयार करणे इत्यादी बाबत ई.विषयावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.
कृषि विभागातील सुरू असलेल्या योजना तसेच ५ टक्के निंबोळी अर्क तयार करणे,ट्रायकोड्रमा,अझोटोबॅक्टर,रायझोबीयम व लिक्वीड कन्सोर्शियाच्या वापर संदर्भात माहिती श्री.आशिष देशमुख तांत्रिक कृषि साहय्यक,पारशीवनी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन व नियोजन श्री.प्रमोद सोमकुवर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पारशिवनी) यांनी केले.
यावेळी उपस्थित शेतकरी गटांच्या वतीने डॉ.अर्चना कडू मॅडम,सौ.पल्लवी तळमले मॅडम व सौ.विजया बोपचे मॅडम यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर आढावा सभा व चर्चा सत्रास मोठ्या संख्येने सेंद्रिय शेती करणाऱ्या गटातील महिला शेतकरी तसेच शेतकरी बंधू उपस्थित होते.
कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री.संदीप बेदरे तज्ञ प्रशिक्षक यांनी व्यक्त केले. व शेतकरी गटाला जैविक निविष्ठा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.