कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :- पो.स्टे .पारशिवनी अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावर मौजा तहसिल कार्यालय , पारशिवनी येथे सोमवार दिनांक २८/११/२०२२ चे पहाटे ०४.०० वा . च्या दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की , तहसिल कार्यालयाचे आवारात रेती वाहतुक करण्याचा परवाना नसतांना वाहतुक करतांना मिळुन आलेला ट्रक क्र . एम . एच . २७ / बी . एक्स ३८२३ हा महसुल विभागातील कर्मचारी पथक तिल तलाठी गणेश चौहान . तलाठी किष्णा माने . तलाठी देवाशिष देशमुख यांनी दंडात्मक कार्यवाही करीता जप्त करून तहसिल कार्यालयाचे आवारात उभा करून ठेवलेला ट्रक क्र . एम . एच- २७ / बी . एक्स.- ३८२३ किमती अंदाजे २०/ – लाख रू . व १० ब्रास रेती किमंती ६२ हजार , ४०० / – रू . असा एकुण २० लाखा,६२ हजार , ४०० / – रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने पारशिवनी तहसिल कार्यालयाचे आवारा तुन गेट तोडून अनधिकृतपणे प्रवेश करून चोरून नेले .
सदर प्रकरणी फिर्यादी – राजु नत्थुजी कुकडे , वय ५७ वर्ष , रा . काटोल नाका , जगदिश नगर , शिवमंदीर जवळ नागपुर ह . मु तहसिल कार्यालय पारशिवनी यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अज्ञात आरोपी . विरूद्ध कलम ३७९ , ४४८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल सोनवने याचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिलीप बासोडे पोलीस स्टेशन पारशिवनी हे पुढील तपास करीत ट्रक व आरोपी चा शोध घेत आहे .