जगदिश वेन्नम
संपादक
उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे व पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे व उपनिरीक्षक करिष्मा मोरे मुख्याध्यापक जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक टेकाम यांच्या उपस्थितीत ही रॅली सिरोंचा शहरात करण्यात आली.
आज समन्वय अधिकारी पोउपनि श्रीकिशन कांदे पो स्टे सिरोंचा यांनी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे,पोलीस अमलदार सुधीर वाकेकर, सुनील घुगे, निर्मला कोडापे यांना सोबत घेवून जि. प. हायस्कुल सिरोंचा येथे विघार्थी पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरुकता या शीर्षखाली वर्ग़ ८ ते ९ व्या वर्गातील मुलां-मुलींकरीता आंतरवर्ग व बाहयवर्ग तासीकेचे आयोजन करून विद्यार्थाना रस्ता वाहतुकीच्या नियमाबाबत आम्ही व परि. पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांनी मार्गदर्शन करून वाढत्या अपघाताचे प्रमाण तसेच वाढते अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच बाह्य वर्ग तासिके दरम्यान विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा सप्ताह रॅलीचे आयोजन करून नगराम टर्निंग या धोक्याच्या ठिकाणी व चौकामध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाविषयी मार्गदर्शन करून वाहतूक शाखेचे कामाविषयी माहिती दिली. यावेळी शाळेतील 89 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभागाच्या प्रयत्नांनी अनेक जागृती मोहीम राबविले जातात यांचाच एक भाग म्हणून अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन पोलीस विभागाने केले.