प्रितम जनबंधु
संपादक
भंडारा,
दिनांक २९ नोव्हेंबर २०२२
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भंडारा जिल्ह्याची अतिशय महत्वाची तथा तातडीची बैठक बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ११ वाजता शिवार्पण टॉवर, राजीव गांधी चौक भंडारा येथे आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीला जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी तसेच ओबीसी महिला व ओबीसी युवा कार्यकारिणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते अपेक्षित आहेत.
या बैठकीला प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिऱ्हेपुंजे, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी बांते, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख रविंद्रजी चौहान, भंडारा जिल्हा प्रभारी रवीजी उपासे, भंडारा जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, राजेश टिचकुले, प्रदीप गोमासे, जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ. प्रीती दुरुगकर (गोसेवाडे), जिल्हा युवा संपर्क प्रमुख यश ठाकरे यांनी केले आहे.